Vijay Raman"विजय रमन हे भारतीय पोलिस सेवेच्या १९७५च्या तुकडीचे मध्य प्रदेश केडरचे अधिकारी. केरळमध्ये बालपण घालवल्यानंतर त्यांनी बडोदा येथील एम.एस. विद्यापीठातून कायदा विषयाचे सुवर्णपदक मिळवल्यानंतर, संपूर्ण देशभरात त्यांची कारकिर्द घडली.पानसिंग तोमर आणि त्याच्या टोळीचा खात्मा करणारी चकमक; डाकू मलखान सिंग आणि फूलन देवी यांचे आत्मसमर्पण; कुख्यात दहशतवादी गाझी बाबाला कंठस्नान घालणारी मोहीम; मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्याचा तपास; भोपाळमधील गॅस दुर्घटनेच्या भीषणतेचा सामना; स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या निवडक अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून चार भारतीय पंतप्रधानांची सुरक्षा हे त्यांच्या पोलिसी कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे. याशिवाय भारतीय बनावटीच्या कारमधून पृथ्वीप्रदक्षिणा करण्याचा विश्वविक्रमही त्यांच्या नावावर आहे!विजय रमन यांचे शौर्य, बुद्धिमत्ता आणि त्यांना असणारी साहसाची आवड यांपेक्षा त्यांची सचोटी नेहमीच अधिक महत्त्वाची होती; अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतही कायद्याचे पालन करण्यास कटिबद्ध असणारे अधिकारी असा त्यांचा लौकीक होता. सन २०२३मध्ये त्यांचे निधन झाले." Read More Read Less
An OTP has been sent to your Registered Email Id:
Resend Verification Code